संगेवाडीच्या महिला मंडलाधिकारी विजया नाईक लाच-लुचपतच्या जाळ्यात, ७०००/ ची लाच स्वीकारताना रंगेहाथ

संगेवाडीच्या महिला मंडलाधिकारी विजया नाईक लाच-लुचपतच्या जाळ्यात 
७०००/ ची लाच स्वीकारताना रंगेहाथ 
सांगोला (क्रांतीचिराग): काल गुरुवार दिनांक ५ मार्च रोजी सांगोला तालुक्यातील संगेवाडी मंडलच्या महिला मंडल अधिकारी श्रीमती विजया महारुद्र नाईक या सात हजार रुपयाची लाच स्वीकारताना सोलापूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्या आहेत .सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काल सांगोला तालुक्यात ही कारवाई केली आहे. त्यामुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. तक्रारदार सातपुते यांच्या आईच्या नावाने खरेदी केलेल्या जमिनीच्या खरेदी दसतावरील नोंद सातबारा उताऱ्यावर  करण्यासाठी महिला मंडल अधिकारी विजया नाईक यांनी तक्रारदार सातपुते यांच्याकडे १०,०००/- रुपये लाचेची मागणी केली होती मंडल अधिकारी विजया नाईक यांचे खाजगी वाहन चालक वैभव मोरे रा .मुंडेवाडी ता पंढरपूर यांनी तडजोडी अंती ७०००/-  रुपयांची लाच स्वीकारली असता सदरची तक्रारदार सातपुते यांच्या कडून स्विकारलेली ७०००/ रुपयाची लाच  महिला मंडल अधिकारी विजया नाईक यांचे सांगण्यावरुन स्विकारल्याने  सांगोला पोलीस स्टेशन येथे लाचलुचपत प्रतिबंधक  कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई काल गुरुवारी ५  मार्च रोजी १-०० एक ते सायंकाळी ५-००  दरम्यान संगेवाडी मंडल अधिकारी कार्यालय येथे करण्यात आली. तक्रारदादाच्या आईच्या नावाने खरेदी केलेल्या शेत जमिनीच्या खरेदी  दस्तावर आलेल्या हरकती वरती सातपुते यांच्या बाजूने निकाल देऊन सात बारा उताऱ्यावर नाव लावणे कामी सातपुते यांच्याकडून मंडलाधिकारी विजया नाईक यांनी १०,०००/- रुपये लाचेची मागणी केली होती परंतु ७०००/- रुपयाची लाच सातपुते यांनी मंडल अधिकारी यांचे खाजगी वाहन चालक वैभव मोरे यांच्याकडे दिल्यानंतर प्रतिबंधक विभागाने सापळा लावून ही कारवाई केली. प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक रवींद्र लाभाते यांनी सांगोला पोलिसात या  संदर्भातली फिर्याद दिली असून सदर घटनेचा  पुढील तपास एसीबी सोलापूरचे पोलीस निरीक्षक शैलेश पवार हे करीत आहेत.
     या कारवाईत लाचेची रक्कम, आरोपीचे मोबाईल, आरोपीच्या अंगावरील शर्ट, तसेच सापळा कारवाईचे मेमरी कार्ड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली असली तरी सर्वसामान्य जनतेतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. यानिमित्ताने तालुक्यातील महसूल विभागात विविध छोट्या मोठ्या कामांसाठी चिरीमिरीची मागणी होत असल्याची चर्चा उघडपणे होताना दिसत आहे.

Comments

Popular posts from this blog

अक्षय कांबळे यांचे ह्रदय विकाराने निधन

स्व. भाई आमदार गणपतराव देशमुख यांच्या पुण्यतिथीनिमित्त धायटी येथे कुस्त्यांचे जंगी मैदान

सांगोला गटविकास अधिकाऱ्यांविरोधात मागासवर्गीय ठेकेदारांचे १७ फेब्रुवारी पासून बेमुदत आंदोलन सुरू आठवड्यानंतरही प्रशासन सायलेंट मोडवरचं...