स्व. भाई आमदार गणपतराव देशमुख यांच्या पुण्यतिथीनिमित्त धायटी येथे कुस्त्यांचे जंगी मैदान
स्व. भाई आमदार गणपतराव देशमुख यांच्या पुण्यतिथीनिमित्त धायटी येथे कुस्त्यांचे जंगी मैदान
सांगोला (क्रांतीचिराग) : सांगोला तालुक्याचे तालुक्याचे माजी आमदार स्व. डॉ. गणपतराव देशमुख यांच्या चतुर्थ पुण्यतिथी निमित्त बुधवार दिनांक 30 जुलै रोजी दुपारी दोन वाजता जंगी कुस्त्यांचे मैदान आयोजित करण्यात आले आहे. या कुस्त्यांच्या दंगलीसाठी पहिले इनाम एक लाख ५२ हजारांचे असून दुसरे इनाम एक लाख २१ हजाराचे लावण्यात आले आहे. तर तिसरे इनाम एक लाख ११ हजार रुपयांचे आहे. पहिल्या इनाम साठी पै.विक्रम भोसले खवासपूर व पै.बाळू अपराज सांगली यांच्या दंगल होणार आहे. यासाठी सिताराम साखर कारखान्याचे चेअरमन शिवाजीराव काळुंखे सर यांच्यावतीने एक लाख ५१ हजाराचे इनाम देण्यात येणार आहे. तर दुसरी प्रतिष्ठित लढत पैलवान गणेश तांबे धायटी, पैलवान अनिल ब्राह्मणे पारनेर यांच्यात लढत होणार असून खरेदी विक्री संघाचे संचालक कृष्णदेव भोसले व शेतकरी सुतगिरणीचे संचालक विष्णुपंत पाटील यांच्या वतीने एक लाख २१ हजाराचे देण्यात येणार आहे. तर तृतीय क्रमांकासाठीची लढत पैलवान अनिल गावडे पुणे,व पैलवान गणेश चव्हाण पंढरपूर यांच्यात होणार आहे. तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मंगळवेढ्याचे सभापती व शाहू राजे कृषी उद्योग सांगोलाचे प्रदीप खांडेकर व उद्योगपती परमेश्वर गेळे यांच्यावतीने एक लाख ११हजाराचे इनाम देण्यात येणार आहे. त्याचबरोबर इतर ९ बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. या कुस्त्यांच्या दंगलीमध्ये महिलांचीही कुस्त्यांची दंगल पाहावयास मिळणार आहे.
महिलांसाठी पहिले इनाम ११०००/- दुसरे नाव ७०००/- तिसरे इनाम ५०००/- ठेवण्यात आली आहेत. महिलांची पहिली लढत पैलवान सानिया जाधव फलटण, आणि पैलवान पायल चव्हाण म्हसवड यांच्यात होणार आहे. दुसऱ्या इनाम्यासाठीची लढत पैलवान राधिका जाधव फलटण आणि पैलवान पूनम मुसगडे बरड यांच्यात तर तिसऱ्या इनामासाठी ची लढत पैलवान आदिती लोखंडे पळशी पंढरपूर आणि पैलवान ज्ञानेश्वरी ढेकळे फलटण यांच्यात होणार आहे.
या कार्यक्रमासाठी खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख, डॉ.अनिकेत देशमुख, सिताराम साखर कारखान्याचे चेअरमन शिवाजीराव काळुंगे सर, टायगर ग्रुप चे भैय्यासाहेब बंडगर, सिताराम साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक सुयोग गायकवाड, ओन्ली रिस्क ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष बंडू नाना मासाळ आदी उपस्थित राहणार आहेत.
सदर कुस्त्यांची दंगल बिरोबा मंदिर मैदान धायटी येथे होणार आहे तरी कुस्त्यांची दंगल पाहण्यासाठी कुस्तीप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजक काशिलिंग आट्यापाट्या संघ धायटी, काशिलिंग ओविकार मंडळ धायटी, कुंडलिक मोरे मित्रपरिवार धायटी, प्रकाश भाऊ देवकते वस्ताद यांच्यावतीने केले आहे.
Comments
Post a Comment