सांगोला गटविकास अधिकाऱ्यांविरोधात मागासवर्गीय ठेकेदारांचे १७ फेब्रुवारी पासून बेमुदत आंदोलन सुरू आठवड्यानंतरही प्रशासन सायलेंट मोडवरचं...
*सांगोला गटविकास अधिकाऱ्यांविरोधात मागासवर्गीय ठेकेदारांचे १७ फेब्रुवारी पासून बेमुदत आंदोलन सुरू*
*आठवड्यानंतरही प्रशासन सायलेंट मोडवरचं..*
सांगोला (क्रांतीचिराग): तालुक्यातील मागासवर्गीय ठेकेदारांनी दिनांक १७ फेब्रुवारी पासून सांगोला तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले असून सदरचे आंदोलन सांगोला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी, संबंधित विस्तार अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी व संबंधित दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी तालुक्यातील मागासवर्गीय ठेकेदार , सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांनी दिनांक १७ फेब्रुवारी पासून सांगोला तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. परंतु प्रशासनाकडून सदरचे आंदोलन बेदखल करण्यात आले असून आंदोलनाला आठवडा उलटला तरी प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची ठोस कारवाई करण्यात आली नाही असे आंदोलकांकडून सांगण्यात आले आहे.
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांचा विकास करणे योजनेतील कामे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील सुशिक्षित बेरोजगार अभियंता व मागासवर्गीय मजूर सहकारी संस्था यांना शासन नियमानुसार जाणिवपूर्वक कामे न देता जाणिवपूर्वक जातीवाद करून दलित वस्तीतील सदरची विकास कामे विनापरवाना ग्रामपंचायत व इतरांना संगनमताने व आर्थिक लाभासाठी दिली असल्याने व देत असल्याने सांगोला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी यांची सखोल चौकशी करून त्यांना तात्काळ बडतर्फ करण्यात यावे. तसेच या भ्रष्टाचारात सहभागी असलेले विस्तार अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी इत्यादी दोषींवर प्रचलित कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी इंजि. बळीराम मोरे , विजय बनसोडे, इंजि. अजय कांबळे, इंजि. शंतनु बनसोडे, शेखर गडहिरे, श्रीमती सखुबाई वाघमारे, युवराज कांबळे, मल्हारी मोरे आदी बेमुदत धरणे आंदोलन करीत असून सदर आंदोलनास स्वाभिमानी धनगर समाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हरिभाऊ पाटील,नुतन जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार, आर.पी.आय.चे तालुका अध्यक्ष खंडू तात्या सातपुते तसेच तालुक्यातील विविध संस्था, संघटनांकडून आंदोलनास पाठिंबा मिळत असला तरी प्रशासनाकडून मात्र आंदोलकांना न्याय मिळवून देण्यासाठी कुठलेही ठोस पाऊल उचलले जात नाही. त्यामुळे आंदोलन अधिक तीव्र करण्याची भूमिका आहे.लवकरच त्यासंदर्भात पुढची पावले उचलली जातील असे आंदोलकांकडून सांगण्यात आले आहे.
Comments
Post a Comment