अक्षय कांबळे यांचे ह्रदय विकाराने निधन

अक्षय कांबळे यांचे ह्रदय विकाराने निधन 
सांगोला (प्रतिनिधी) : येथील शिवाजीनगर (सांगोला ) रहिवासी अक्षय बाबासाहेब कांबळे वय वर्षे २५ यांचे ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मंगळवार दिनांक २७ जानेवारी रोजी पहाटे ३-०० च्या सुमारास अक्षय कांबळे यांना ह्रदय विकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचे निधन झाले. अक्षय कांबळे यांचे मुळगाव जत तालुक्यातील येळवी हे असून मागील काही वर्षांपासून ते सांगोला येथे वास्तव्यास आहेत. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण, पत्नी आणि लहान मुलगी असा परिवार आहे. अक्षय कांबळे यांच्या निधनामुळे नातेवाईक आणि मित्रपरिवारात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या तिसऱ्या दिवसाचा विधी गुरुवारी सकाळी ७-३० वाजता स्मशानभूमी सांगोला येथे होणार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे.

Comments

Popular posts from this blog

भेसळयुक्त दुधाची विषारी गंगा जावळ्यातून थेट सोनाई पर्यंत जायची अन् तिथून पुढे...?'अन्न व औषध प्रशासनाची जवळयात मोठी कारवाई १५ लाख रुपये किंमतीच्या ३७ हजार ५३२ लिटर भेसळयुक्त दूधाची प्रशासनाकडून विल्हेवाट

२४ तासात दरोड्यातील ४ आरोपी अटक सांगोला पोलिसांची मोठी कामगिरी