भेसळयुक्त दुधाची विषारी गंगा जावळ्यातून थेट सोनाई पर्यंत जायची अन् तिथून पुढे...?'अन्न व औषध प्रशासनाची जवळयात मोठी कारवाई १५ लाख रुपये किंमतीच्या ३७ हजार ५३२ लिटर भेसळयुक्त दूधाची प्रशासनाकडून विल्हेवाट
' भेसळयुक्त दुधाची विषारी गंगा जावळ्यातून थेट सोनाई पर्यंत जायची अन् तिथून पुढे...?' अन्न व औषध प्रशासनाची जवळयात मोठी कारवाई १५ लाख रुपये किंमतीच्या ३७ हजार ५३२ लिटर भेसळयुक्त दूधाची प्रशासनाकडून विल्हेवाट सांगोला (प्रतिनिधी): "भेसळयुक्त दुधाची विषारी गंगा जावळ्यातून थेट सोनाई पर्यंत जायची अन् तिथून पुढे.... आपल्या किचन पर्यंत? हे विष अनेकांनी अन्न नव्हे तर सकस आणि पौष्टिक अन्न म्हणून सेवन केलं असेल.... अगदी डोळे झाकून... कोणत्या आईने आपल्या लेकरांची भुक शमविली असेल... आजारी रुग्णांनी ते सेवन करुन आपला आजार अधिक वाढविला असेल... कोणाचं निरोगी शरीर या विषाने व्याधीग्रस्त झाले असेल... निव्वळ या विषारी दुधाने अनेकांना आपला प्रवास अर्ध्यावर सोडावा लागला असेल...या विषारी दुधाने बरचं काही केले असेल...? या विषारी दुधाने काही झाले असेल ते असेल परंतु तुकाराम मुंढे सारख्या निडर, प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या रास्त भुमिकेमुळे, धाडसी कारवाईमुळे माणसात लपलेले माणसातले हैवान जगासमोर येवू लागले आहेत. हे मात्र निश्चित महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्...