वंचित बहुजन आघाडीचे अँड.अरुण (आबा) जाधव यांचा सांगोल्यात सत्कार
वंचित बहुजन आघाडीचे अँड.अरुण (आबा) जाधव यांचा सांगोल्यात सत्कार
सांगोला (क्रांतीचिराग): वंचित बहुजन आघाडीची मुलुख मैदानी तोफ म्हणून ओळखले जाणारे राज्याचे नेते अँड.अरुण (आबा) जाधव यांचा सांगोला येथे नुकताच सत्कार करण्यात आला. शनिवार दिनांक ४ ऑक्टोबर रोजी सांगोला येथील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते तसेच आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या वतीने वंचित बहुजन आघाडीचे राज्याचे नेते एडवोकेट अरुण आबा जाधव यांचा सत्कार करण्यात आला. ते सांगोला येथे खाजगी दौऱ्यावर आले असता वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्ते आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार केला. याप्रसंगी राज्यातील विविध प्रश्नांवर संवाद साधत एडवोकेट जाधव यांनी
कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
याप्रसंगी वंचित आघाडीचे शशिकांत बनसोडे, मा.तालुका अध्यक्ष गोपाळ लांडगे ( सर ) , सुनिल काटे, जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ गुळीग, विकी काटे, कल्पना मोहिते, दिग्विजय कांबळे, खंडेराव लांडगे, युवक आघाडीचे जिल्हा महासचिव प्रविण आण्णा वाघमारे, स्वाभिमानी होलार समाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव जावीर , सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब भोसले, समाधान जावीर , रविप्रकाश साबळे , भैय्या दौंडे , माने ( पास्टर ) रविकांत बनसोडे , विशाल चव्हाण , इ सह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment