उदनवाडी येथील श्री दादासाहेब जगताप विद्यालय या प्रशालेच्या 10 बॅच सन 2004-05 चा स्नेहमेळावा संपन्न
उदनवाडी येथील श्री दादासाहेब जगताप विद्यालय या प्रशालेच्या 10 बॅच सन 2004-05 चा स्नेहमेळावा संपन्न जुजारपुर (सुभाष गाडे)दिनांक 10 मे रोजी श्री दादासाहेब जगताप विद्यालय उदनवाडी येथे प्रशालेच्या सन 2004-05 बॅच चे माजी विद्यार्थी ,विद्यार्थिनी,शिक्षक तसेच शेक्षकेतर कर्मचारी यांचे उपस्थित माजी विद्यार्थी यांचा 10 मे रोजी सकाळी हा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता..सर्वप्रथम सामूहिक राष्ट्रगीत घेण्यात आले.तदनंतर विद्येची देवता सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करून..कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रशालेचे मुख्याध्यापक राजाराम वलेकर (सर)उपस्थित होते. सर्व शिक्षकांचा सत्कार हा प्रशालेच्या माजी विद्यार्थी,विद्यार्थिनी यांचे हस्ते करण्यात आला.सन एसएससी 2004-05बॅच चे माजी विद्यार्थी यांचेकडून कृतज्ञता म्हणून विद्यार्थ्यासाठी बेंच भेट देण्यात आल्या..अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात हा स्नेहसंमेलन कार्यक्रम पार पडला.तब्बल 20 वर्षांनी सर्व माजी विद्यार्थी ,विद्यार्थीनी एकमेकांना भेटून खूप आनंद झाला...आणि हा गेट टुगेदर अविस्मरणीय असाच झाला.पुढील कार्यक्रम हा हॉटेल चांदणी येथील हॉल मध्ये पार पडला..यावेळी उपस्थित शिक्षक यांनी माजी विद्यार्थी यांना मोलाचे मार्गदर्शन केले...मुख्याध्यापक श्री राजाराम वलेकर सर आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, जीवनात एकवेळ पैसे थोडे कमी कमवले तर चालतील पण आपली मुले आणि येणारी पिढी संस्कारक्षम बनवा...यावेळी वाघमारे सर, भगत सर,बाळासाहेब वलेकर सर,घाडगे सर यांनी उपस्थित माजी विद्यार्थी विद्यार्थिनी यांना मोलाचे मार्गदर्शन केले.स्वागत समारंभ झाल्यावर सगळ्यांनी भोजनाचा आस्वाद घेतला..त्यानंतर संगीत खुर्ची,लिंबू चमचा असे गमतीशीर खेळ खेळून सगळ्यांनी आनंद साजरा केला...ग्रुप फोटो काढण्यात आले...ग्रुप डान्स करून सर्व माजी विद्यार्थी ,विद्यार्थिनी यांनी मनसोक्त शालेय जीवनाचा आनंद घेतला..शेवटी लक्ष्मण करडे याने आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.
Comments
Post a Comment