कोळा पंचायत समिती गणातून निवडणूक लढवणार - सौ.सविता शंकर तोडकर

कोळा पंचायत समिती गणातून निवडणूक लढवणार -  सौ.सविता शंकर तोडकर
सांगोला (क्रांतीचिराग): तालुक्यातील कोळा येथील शिवसेना शिंदे पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्या सौ.सविता शंकर तोडकर यांनी सांगोल्याचे माजी आमदार ऍडव्होकेट शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वात शिवसेना शिंदे पक्षाच्या उमेदवार म्हणून कोळा पंचायत समिती सदस्य पदाची निवडणूक मोठ्या ताकतिने  लढवणार असल्याचा पक्का निर्धार केला असून त्यादृष्टीने मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
     शिवसेना शिंदे पक्षात धडाडीने काम करणारे तोडकर कुटुंब हे परिसरात लोकप्रिय आहे.त्यामुळे सौ.सविता शंकर तोडकर यांच्या नावाची पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात जोरदार चर्चा आहे.महिला वर्गातही यांच्या नावाची क्रेझ आहे.कायम पक्षातही एकनिष्ठ असल्यामुळे,लोकांच्या सुख दुःखात सहभागी होऊन काम करणाऱ्या सौ.सविता शंकर तोडकर यांना पक्षश्रेष्ठींकडून उमेदवारी नक्कीच मिळेल असा विश्वास असलेने त्यांनी   कोळा पंचायत समिती सदस्य पदाची निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर करून त्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. गोरगरीब जनतेसाठी सामाजिक कार्याचा जागर करीत निघालेल्या सौ.सविता शंकर तोडकर या निश्चितपणे निवडून येतील अशी कोळा परिसरात दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. कोळा पंचायत समिती गण हा सर्वसाधारण महिला साठी आरक्षित प्रवर्ग आहे.महिला बचत गट,घरकुलांचे काम,रस्त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी,शासकीय कार्यालयात कामांच्यासंदर्भात असलेली अडचणी सोडवणे तसेच नागरिकांच्या सुख दुःखात सामील होऊन कायम चर्चेत असणारे नाव म्हणजे सौ.सविता शंकर तोडकर होय..सांगोला तालुक्याचे पाणीदार माजी आमदार ऍडव्होकेट शहाजी बापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे पक्षाकडून कोळा पंचायत समिती सदस्य पदाची ही निवडणूक आपण कोणत्याही परिस्थितीत लढवणारच असल्याचे ठाम मत तोडकर यांनी पत्रकारांशी  बोलताना व्यक्त केले.

Comments

Popular posts from this blog

उदनवाडी येथील श्री दादासाहेब जगताप विद्यालय या प्रशालेच्या 10 बॅच सन 2004-05 चा स्नेहमेळावा संपन्न

स्व. भाई आमदार गणपतराव देशमुख यांच्या पुण्यतिथीनिमित्त धायटी येथे कुस्त्यांचे जंगी मैदान

आज सांगोल्यात राजयोग अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीचा पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते शुभारंभ