जवळा जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढण्यासाठी डॉ.परेश खंडागळे इच्छुक

जवळा जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढण्यासाठी डॉ.परेश खंडागळे इच्छुक 
सांगोला (क्रांतीचिराग): येथील खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे सर्वेसर्वा आणि वैद्यकीय व्यवसायात देखील सामाजिक भान जपणारे डॉ. परेश खंडागळे हे येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये जवळा जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढविण्यास इच्छुक असून त्यांनी त्यादृष्टीने मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली असल्याची माहिती डॉ.परेश खंडागळे यांनी दिली आहे.
     मागिल निवडणूकी मध्ये त्यांनी जवळा पंचायत समिती गणातून निवडणूक लढविली होती. मागिल निवडणूकीत त्यांना जनतेतून अनपेक्षित असा प्रतिसाद मिळाला असल्याने आता जवळा जिल्हा परिषद गटातील जनता आणि कार्यकर्त्यांमधून डॉ.परेश खंडागळे यांना जिल्हा परिषदेची निवडणूक लढविण्या संदर्भात मोठ्या प्रमाणात आग्रह होत आहे. त्यामुळे केवळ जनता आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आपण जवळा जिल्हा परिषदेची निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे सांगत आजपर्यंत आपण केलेल्या सामाजिक कार्याचा निवडणूकीत सकारात्मक प्रतिसाद मिळून आपण विजयी होऊ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

Comments

Popular posts from this blog

उदनवाडी येथील श्री दादासाहेब जगताप विद्यालय या प्रशालेच्या 10 बॅच सन 2004-05 चा स्नेहमेळावा संपन्न

स्व. भाई आमदार गणपतराव देशमुख यांच्या पुण्यतिथीनिमित्त धायटी येथे कुस्त्यांचे जंगी मैदान

आज सांगोल्यात राजयोग अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीचा पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते शुभारंभ