रविवारी ५ ऑक्टोबर रोजी शिवशक्ती महिला अर्बन बँकेच्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन
रविवारी ५ ऑक्टोबर रोजी शिवशक्ती महिला अर्बन बँकेच्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन
सांगोला (क्रांतीचिराग): येथील शिवशक्ती उद्योग समूह संचलित शिवशक्ती महिला अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा उद्घाटन सोहळा रविवार दिनांक ५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११-५० वाजता शिवणे मठाचे स.स. शिवदास घाडगे महाराज यांच्या शुभ हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती शिवशक्ती उद्योग समूहाचे संस्थापक शांताराम सुरवसे व शिवशक्ती महिला अर्बन बँकेचे संस्थापक सिताराम तथा रमेश सुरवसे यांनी दिली .
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सांगोला तालुक्याचे लोकप्रिय युवा आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख, माजी आमदार अँड .शहाजी बापू पाटील तसेच विधान परिषदेचे माजी आमदार दिपक आबा साळुंखे पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
सदर कार्यक्रमास सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाबुरावजी गायकवाड, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत, शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. अनिकेत देशमुख, उद्योगपती बाळासाहेब एरंडे, ज्येष्ठ नेते तानाजी काका पाटील, प्राध्यापक पी.सी.झपके सर, माजी नगराध्यक्ष रफिक नदाफ, उद्योगपती भाऊसाहेब रुपनर, सूर्योदय परिवाराचे अनिल भाऊ इंगवले, तहसीलदार संतोष कणसे, पोलीस निरीक्षक विनोद घुगे, सांगोला नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी, माणगंगा परिवाराचे नितीन इंगवले, विठ्ठल मल्टीस्टेटचे बेंद्रे ,कृष्णाई बँकेचे नितीन खटकाळे, अँड .उदय घोंगडे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन इंजिनियर रमेश जाधव, राजमाता परिवाराचे आनंद भाऊ माने, सहकार अधिकारी अमर गोसावी, विकास कंटाळा, सतीश सावंत, अमर गोडसे, संदीप सुरवसे, आर.ए.बनकर, गुंडा दादा खटकाळे, इब्राहिम मणेरी, अरविंद केदार, किरण पांढरे, दिगंबर गोरे, सी. ए .जुबेर मुजावर, संजय पवार, सुभाष सुरवसे, अशोक औताडे यांचे सह विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी च्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवशक्ती महिला अर्बन बँकेचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
महिलांच्या कडून महिलांसाठी महिलांच्या प्रगतीसाठी तसेच महिलांच्या स्वप्नांना आर्थिक बळ देण्यासाठी सदर बँकेची निर्मिती करण्यात आल्याची माहिती बँकेच्या चेअरमन सौ. सविता सिताराम सुरवसे आणि व्हा. चेअरमन चेअरमन सौ संगीता बापू भोसले यांनी दिली आहे. तरी शिवशक्ती महिला अर्बन बँकेच्या उद्घाटन सोहळ्यास आपण उपस्थित राहून आम्हाला प्रेरणा द्यावी असे आवाहन शिवशक्ती उद्योग समूह तसेच शिवशक्ती महिला अर्बन बँकेच्या चेअरमन, व्हा. चेअरमन आणि संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.सोहळ्याचे आयोजन
.
Comments
Post a Comment