आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मोफत आरोग्य तपासणी, उपचार व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजनसांगोल (प्रतिनिधी) - महाराष्ट्र राज्याचे
आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मोफत आरोग्य तपासणी, उपचार व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन
सांगोल (प्रतिनिधी) - महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या 55 व्या वाढदिवसानिमित्त, सांगोला तालुक्यातील नामवंत खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कडलास रोड सांगोला येथे भव्य मोफत तपासणी, उपचार व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन मंगळवार दिनांक 22 जुलै 2025 रोजी करण्यात येणार आहे.
या शिबिरामध्ये विविध आजारांवर मोफत तपासणी, आवश्यक उपचार व गरज भासल्यास शस्त्रक्रिया देखील केली जाणार आहे.
तरी सांगोला तालुक्यातील गरीब व गरजू रुग्णांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन या शिबिराचा लाभ घ्यावा असे आव्हान खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे नामवंत डॉ परेश खंडागळे यांनी केले आहे.
Comments
Post a Comment