पश्चिम महाराष्ट्र मधील पत्रकारांना एकत्र आणून राज्य सरकारला जाब विचारणार* मिर्झा गालिब मुजावर
*पश्चिम महाराष्ट्र मधील पत्रकारांना एकत्र आणून राज्य सरकारला जाब विचारणार* मिर्झा गालिब मुजावर
सोलापूर (प्रतिनिधी ) पत्रकार सुरक्षा समिती वतीने गेल्या आठ वर्षापासून प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना पत्रकारांसाठी आरोग्य योजना विमा योजना यादीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती राज्यातील पत्रकारांचे शासन दरबारात नोंदणी राज्यातील युट्युब व पोर्टलला शासकीय मान्यता ग्रामीण भागातील पत्रकारांना एसटी बस मधून मोफत प्रवास इत्यादी विषयावर पत्रकार सुरक्षा समितीचे वतीने आंदोलन उपोषण निवेदन त्याचबरोबर राज्य सरकारकडे पत्रव्यवहार करत असून पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा पत्रकार सुरक्षा समिती सातत्याने प्रयत्न करत आहे. पत्रकारांच्या प्रश्नावर राज्य सरकारची भूमिका नेहमीच उदासीन राहिली असून पत्रकारांच्या प्रश्नावर राज्य सरकार संवेदनाहीन असून पत्रकारांच्या त्यागाचा राज्य सरकारला विसर पडला काय? असा जळजळीत सवाल देखील मिर्झा गालिब मुजावर यांनी राज्य सरकारला विचारला असून पत्रकारांना संघर्ष केल्याशिवाय काहीच हाती मिळणार नाही त्यासाठी पत्रकारांनी एकत्र यायला हवं महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या संदर्भात पश्चिम महाराष्ट्र मधील पत्रकारांना एकत्र आणून पत्रकारांच्या प्रश्नावर राज्य सरकारला जाब विचारणार असल्याची माहिती पत्रकार सुरक्षा समितीचे पश्चिम महाराष्ट्र संघटक तथा दैनिक तुफान क्रांती चे संपादक मिर्झा गालिब मुजावर यांनी प्रसार माध्यमांना दिली असून पश्चिम महाराष्ट्र मधील पत्रकारांचे प्रश्न सोडवल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही अशी ग्वाही देखील पत्रकारांना दिली आहे.
Comments
Post a Comment