आज सांगोला येथे परिवर्तनवादी कवी संमेलनाचे आयोजन

आज सांगोला येथे परिवर्तनवादी कवी संमेलनाचे आयोजन
सांगोला/प्रतिनिधी ः
1 मे महाराष्ट्र दिनाचे औचित साधून दिनांक 1 मे रोजी सांगोला येथे परिवर्तनवादी विचारमंचच्यावतीने ‘विद्रोही कवी संमेलन’ आयोजित केले असून हे कवी संमेलन सांगोला शहरातील हॉटेल फाइव स्टार या ठिकाणी आयोजित केले असल्याची माहिती आयोजक जगदीश मागाडे यांनी दिली.
या कवी संमेलनाचे उद्घाटन सांगोला अर्बन बँकेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रभाकर माळी यांच्या हस्ते होणार असून या कवी संमेलनाचे अध्यक्षस्थान दलीतमित्र साबळे गुरुजी हे भूषवणार आहेत. या कवी संमेलनासाठी अ‍ॅड. महादेव कांबळे, गिरीधर इंगोले, प्रेमकुमार वाघमारे, अर्चना खर्चे, जगदीश मागाडे, अनिल केंगार, गौसपाक मुलाणी आदी निमंत्रित कवी असून हा कार्यक्रम सकाळी 11 ते 2:30 पर्यंत या वेळेत संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमासाठी प्रभाकर कसबे (गुरुजी), शहाजी गडहिरे, सतीश (भाऊ) सावंत, बापूसाहेब ठोकळे, शशिकला बाबर, अरुण कसबे, माणिक बाबर, आनंदा वाघमारे, वैशाली सावंत (मॅडम), दादासो वाघमारे आदी उपस्थित राहणार आहेत. तरी या विद्राही कवी संमेलनासाठी सांगोला तालुका व पंचक्रोशीतील ग्रामस्थ, नागरिकांनी उपस्थित राहून आस्वाद घ्यावा असे आवाहन आयोजक जगदीश मागाडे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

उदनवाडी येथील श्री दादासाहेब जगताप विद्यालय या प्रशालेच्या 10 बॅच सन 2004-05 चा स्नेहमेळावा संपन्न

स्व. भाई आमदार गणपतराव देशमुख यांच्या पुण्यतिथीनिमित्त धायटी येथे कुस्त्यांचे जंगी मैदान

आज सांगोल्यात राजयोग अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीचा पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते शुभारंभ