*श्रीरामपूर हॉटेल चालकावर तलवारीने हल्ला**दोन कामगारांच्या अंगावरही उकळते तेल फेकून केले जखमी*

*श्रीरामपूर हॉटेल चालकावर तलवारीने हल्ला*
*दोन कामगारांच्या अंगावरही उकळते तेल फेकून केले जखमी*
        अहिल्यानगर: (जिल्हा प्रतिनिधी - प्रा. ज्ञानेश्वर बनसोडे) श्रीरामपूर शहरातील शिवाजी चौकातील नेवासा रोड वरील दिल्ली दरबार या हॉटेलवर शाहरुख नावाच्या तरुणाने तलवारीने हल्ला केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. जेवणाचे पार्सल उशिरा मिळाल्याच्या कारणावरून या तरुणांने  हॉटेलच्या या दोन कामगारांवरती उकळते तेल फेकून गंभीर जखमी केले आहे . समजलेल्या माहितीनुसार काउंटरवरील रोख रक्कमही लंपास करण्यात आली आहे.हॉटेल मालक आसिफ रफिक शेख( वय ३३) यांनी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन मध्ये दिलेल्या फिर्यादीनुसार गुरुवार दिनांक ९ एप्रिल २०२६ रोजी रात्री साधारण साडेनऊ वाजता ही घटना घडली आहे. श्रीरामपूर शहर परिसरातील शाहरुख नावाचा तरुण हॉटेलवर आला. व म्हणाला की; माझ्या नावाचे पार्सल वेळेत का दिले नाहीस? मी कोण आहे? तू मला ओळखले नाही का? असे म्हणत त्याने असिफ शेख यांना शिवीगाळ केली . त्यानंतर शाहरुखने आपल्या  दुचाकी गाडीला लावलेले तलवार काढून आशिफ शेख यांच्या डोक्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र शेख हे काउंटर मध्ये घुसल्याने जीवावर बेतलेले  त्यांचे संकट निभावले . सुदैवाने त्यांना कोणतेहिन प्रकारचे इजा झाले नाही.
यावेळी मदतीला धावून आलेल्या रामराज राजेंद्र आणि आरिफ रफिक शेख या दोन कामगारांवर आरोपीने उकळत्या तेलाची कढई उपडी केली. यामध्ये दोन्ही कामगार गंभीरित्या भाजलेले आहेत. हल्ला केल्यानंतर आरोपीने हॉटेलच्या काउंटर मधून सात ते आठ हजाराची  रोकड  लंपस केल्याचे समजते आहे. जाताना म्हणाला की"मी पुन्हा हॉटेल मध्ये येऊन दंगा करेल !आणि तुला गोळ्या घालून ठार मारेल अशी धमकी देत दुचाकीवरून पसार झाला. दोन्ही जखमी कामगारांना श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी प्रवरा ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी हलविण्यात आले आहे.या प्रकरणी आसिफ शेख यांच्या तक्रारीवरून श्रीरामपूर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे श्रामपूर शहरातील नागरिकांमध्ये व व्यापाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.


.

Comments

Popular posts from this blog

अक्षय कांबळे यांचे ह्रदय विकाराने निधन

स्व. भाई आमदार गणपतराव देशमुख यांच्या पुण्यतिथीनिमित्त धायटी येथे कुस्त्यांचे जंगी मैदान

सांगोला गटविकास अधिकाऱ्यांविरोधात मागासवर्गीय ठेकेदारांचे १७ फेब्रुवारी पासून बेमुदत आंदोलन सुरू आठवड्यानंतरही प्रशासन सायलेंट मोडवरचं...