*श्रीरामपूर हॉटेल चालकावर तलवारीने हल्ला**दोन कामगारांच्या अंगावरही उकळते तेल फेकून केले जखमी*
* श्रीरामपूर हॉटेल चालकावर तलवारीने हल्ला* *दोन कामगारांच्या अंगावरही उकळते तेल फेकून केले जखमी* अहिल्यानगर: (जिल्हा प्रतिनिधी - प्रा. ज्ञानेश्वर बनसोडे) श्रीरामपूर शहरातील शिवाजी चौकातील नेवासा रोड वरील दिल्ली दरबार या हॉटेलवर शाहरुख नावाच्या तरुणाने तलवारीने हल्ला केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. जेवणाचे पार्सल उशिरा मिळाल्याच्या कारणावरून या तरुणांने हॉटेलच्या या दोन कामगारांवरती उकळते तेल फेकून गंभीर जखमी केले आहे . समजलेल्या माहितीनुसार काउंटरवरील रोख रक्कमही लंपास करण्यात आली आहे.हॉटेल मालक आसिफ रफिक शेख( वय ३३) यांनी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन मध्ये दिलेल्या फिर्यादीनुसार गुरुवार दिनांक ९ एप्रिल २०२६ रोजी रात्री साधारण साडेनऊ वाजता ही घटना घडली आहे. श्रीरामपूर शहर परिसरातील शाहरुख नावाचा तरुण हॉटेलवर आला. व म्हणाला की; माझ्या नावाचे पार्सल वेळेत का दिले नाहीस? मी कोण आहे? तू मला ओळखले नाही का? असे म्हणत त्याने असिफ शेख यांना शिवीगाळ केली . त्यानंतर शाहरुखने आपल्या दुचाकी गाडीला लावलेले तलवार काढून आशिफ शेख यांच्या...